Big Boss : छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणून बिग बॉसकडे पाहिले जाते. अवघ्या दोन दिवसात बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. येत्या २९ आणि ३० जानेवारीला बिग बॉसचा अंतिम सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी यंदाच्या पर्वाच्या विजेत्याचे नाव समोर येऊ लागले आहे. त्यासोबत या पर्वात रनरअप ठरलेल्या स्पर्धकांची नावेही अगोदरच समोर आलेली आहेत.
यंदा हिंदी बिग बॉसचे १५ वे पर्व फारसे लोकप्रिय ठरले नसून बिग बॉसला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे टीआरपीच्या स्पर्धेत बिग बॉस मागे पडल्याचे पाहायला मिळाले. या शो ला रंजक बनवण्यासाठी अभिजीत बिचुकले सारखे अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. मात्र तरीही यंदाचा बिग बॉस फारसा लोकप्रिय ठरला नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसमधून राखी सावंत आणि रश्मी देसाई बाहेर पडल्या. त्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरात फक्त ६ स्पर्धक शिल्लक आहेत.
सध्या बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळत आहे. एका ट्विटर हँडलने केलेल्या ट्विटनुसार, तेजस्वी प्रकाश ही यंदाच्या बिग बॉसची विजेती होऊ शकते. तर प्रतीक सहजपाल हा यंदाच्या बिग बॉसचा उपविजेता ठरणार आहे. तर करण कुंद्रा आणि शमिता शेट्टी हे दोघांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान हे ट्विट केवळ अंदाज म्हणून करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार हे प्रेक्षकांना रविवारीच समजणार आहे.
Web Title : Before the final ceremony of the Bigg Boss competition, the name of the winner came to the fore