Home Ahmednagar Live News बेलापुर् गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

बेलापुर् गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

Belapur A woman was seriously injured in an explosion due to a gas leak

Ahmednagar Live News Shrirampur | बेलापुर: गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील ज्योती शशिकांत शेलार यांचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या दोनवर पोहोचली आहे.

मागच्या आठवड्यात गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या महीलेचेही आज दुर्देवी निधन झाले असुन या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांची संख्या २ वर पोहोचली आहे. येथील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत शेलार यांच्या घरात सकाळी साडेसहा वाजता अचानक स्फोट झाला होता,या स्फोटामुळे घरावरील पत्रे देखील उडून गेले होते. संपूर्ण बेलापुर परिसर अक्षरशः या आवाजाने दणाणून गेला होता. यावेळी लागलेल्या आगीत घरातील शशिकांत शेलार,ज्योती शशिकांत शेलार, यश शशिकांत शेलार, नमश्री शशिकांत शेलार हे चौघे जण गंभीर जखमी झाले होते, त्यांना प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार हाँस्पिटल व नंतर लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते, तेथे उपचार सुरु असताना मुलगी नमश्री हीचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले,तर यश यास दवाखान्यातुन घरी सोडण्यात आले होते, शशिकांत व त्यांची पत्नी ज्योती यांच्यावर उपचार सुरुच होते, या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पत्रकार देविदास देसाई यांनी ५० हजार रुपयापर्यत आर्थिक मदत मिळवुन दिली होती, आज या दुर्घटनेतील जखमी सौ.ज्योती शशिकांत शेलार यांचेही उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झाले, त्यांचेवर बेलापुर येथील शेलार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Belapur A woman was seriously injured in an explosion due to a gas leak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here