संगमनेरातही लाडक्या बहिणींनी चमत्कार केला – शिवराजसिंह चौहान
Sangamner Assembly Election: ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला असाच चमत्कार महाराष्ट्रामध्ये सुद्धा केला असल्याचा विश्वास केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.
संगमनेर: विधानसभेच्या निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात बदल झाला आहे. सध्या केंद्रात डबल इंजिन तर राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे. ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला असाच चमत्कार महाराष्ट्रामध्ये सुद्धा केला असल्याचा विश्वास केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला.
नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शिर्डीतील साईबाबांचे, शनिशिंगणापूरला शनि महाराजांचे दर्शन घेऊन त्र्यंबकेश्वरला जाताना संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर काहीवेळ थांबले होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी त्यांचे तालुक्याच्यावतीने स्वागत केले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ हजार ८०० कोटी रुपयांचा पीकविमा जमा आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, सरकार तुमच्यासोबत असून ग्रामीण भागाचा विकास करणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी तर आमदार अमोल खताळ यांनी एक वेगळाच चमत्कार केला असल्याचे केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले. तर ते शिर्डीवरून थेट नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वरला जाणार होते. परंतु संगमनेरकरांच्या प्रेमापोटी येथून जाण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून संगमनेरमध्ये आले होते, परंतु यावेळी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री म्हणून तुम्ही आलेले आहात. अजूनही उच्च पदावर जावो, अशा संगमनेरकरांच्या तुम्हाला शुभेच्छा आहे, फक्त आम्हाला विसरू नका, असे आमदार खताळ म्हणाले. झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. परदेशातून आलेले नवीन तंत्रज्ञान तसेच विविध प्रयोगांमुळे शेतकऱ्यांमध्ये परिवर्तन होत आहे.
Web Title: Beloved sisters also performed a miracle in Sangamner Shivrajsinh Chauhan
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News