Home संपादकीय क्रेडीट कार्डचा फास लागू नये म्हणून चार गोष्टी लक्षात ठेवा

क्रेडीट कार्डचा फास लागू नये म्हणून चार गोष्टी लक्षात ठेवा

Best way to pay off a credit card debt:

best way to pay off a credit card debt

क्रेडीट कार्डवर मिळणाऱ्या सोयी आपल्याला छान वाटतात. पण याच क्रेडीट कार्डच्या सापळ्याचा फास आवळ्याला लागला तर काय होईल. क्रेडीट कार्डचे फायदे तर आपल्याला हवे आहेत. आणि आपली मानही कर्जाच्या जाळ्यात अडकवून घ्यायची नसेल तर काय करायचं?

१. अनेकांना वाटतं, आपल्या हातात क्रेडिट कार्ड आलंय, म्हणजे आपल्याला अल्लादीनचा दिवाच आता सापडलाय.. कितीही खर्च करा. पण त्यामुळे तुमच्या खिशाचे आणि पर्यायानं आयुष्याचेही लचके तुटायला वेळ लागणार नाहीत. त्याऐवजी दरमहा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींवर खर्च करावा लागणार (च) आहे, याची यादी आधी तयार करा. जो खर्च आपल्याला कमी करता येईल, त्यासाठी खिशाचं तोंड जेवढं आवळता येईल तेवढा आवळा. त्यानंतर महिनाअखेरीस आपल्याकडे किती पैसे राहू शकतील याचा अंदाज घ्या, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट सायकल लक्षात घ्या, ठराविक तारखेच्या आत तेवढी रक्कम आपण भरू शकू याची खात्री असेल, तरच क्रेडिट कार्डवरून ती खरेदी करा आणि त्यावरील सवलतींचा लाभही घ्या.

२. क्रेडिट कार्डवरून तुम्ही जेव्हा काही खरेदी करता, ठरावीक मुदतीत जर तुम्ही पूर्ण पैसे भरू शकला नाहीत, तर ‘मिनिमम पेमेंट’ करण्याची सुविधा तुम्हाला असते, पण त्या चक्रात न फसता क्रेडिट कार्डचं बिल त्या त्या महिन्यातच कसं भरता येईल याकडे कटाक्ष ठेवा.

३. क्रेडिट कार्डचा उपयोग केला, तर अनेक ठिकाणी काही सवलती, पॉइंट्स मिळतात. या सवलती मिळवण्यासाठी अनेक जण एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डस् खरेदी करतात. त्या त्या क्रेडिट कार्डवरची रक्कम आपल्याला कमी दिसत’ असली, तरी एकत्रित विचार केला तर ही रक्कम बरीच मोठी होते. त्यामुळे शक्यतो जास्त क्रेडिट कार्डस्च्या फंदात पडू नका.

४- काही जण क्रेडिट कार्डचा उपयोग एटीएम किंवा गिफ्ट कार्डसारखा करतात. त्याऐवजी तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डस् असतील तर ज्या कंपनीच्या क्रेडिट कार्डवर व्याजाचा दर कमी असेल, त्या क्रेडिट कार्डवर आपलं कर्ज हस्तांतरित होत असेल, तर त्यासाठी त्याचा उपयोग करा.

How to pay off credit card debt
  1. Use a balance transfer credit card.
  2. Consolidate debt with a personal loan.
  3. Borrow money from family.
  4. Pay off high-interest debt first.
  5. Pay off the smallest balance first.

Web Title: Best way to pay off a credit card debt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here