Home राष्ट्रीय पहिल्यांदाच आमदार झालेले हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, भाजपचा मोठा धमाका

पहिल्यांदाच आमदार झालेले हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, भाजपचा मोठा धमाका

Bhajanlal Sharma Rajasthan New CM : राजस्थानमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळाली असून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आज करण्यात आला आहे.

Bhajanlal Sharma Rajasthan New CM

राजस्थान: मध्य प्रदेशनंतर आता भाजपने राजस्थानमध्ये दुसरा धमाका केला आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधराराजे शिंदे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री, तर वासुदेव देवनानी हे विधानसभेचे अध्यक्ष असतील.

भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.

भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजप आणि आरएसएसमध्ये दीर्घकाळ काम केले. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे 7 टक्के लोक ब्राह्मण आहेत.

कोण आहेत झालेल्या भजनलाल शर्मा

– प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्षसंघटनेत काम.

– आमदार म्हणून पहिल्यांदाच निवड.

– सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार.

– भजनलाल यांचा मतदारसंघ भाजपचा परंपरागत गड.

– तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजनलाल यांना संधी देण्यात आली.

– भजनलाल यांना तिकीट दिलं त्याविरोधात लाहोटी समर्थकांनी भाजप मुख्यालयात आंदोलन केलं होतं.

– भजनलाल शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी.

Web Title: Bhajanlal Sharma Rajasthan New CM

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here