Bhandardara Dam: भंडारदरा धरण ८० टक्के भरले, आंब्रेला फॉलचे विशेष आकर्षण
भंडारदरा | Bhandardara Dam: भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. धो धो पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाले वाहू भरून वाहत आहे. धरणाच्या पातळीत वाढ होत असल्याने पातळी स्थिर ठेवण्यासाठी भंडारदरा जलाशयातून पाणी सोडण्यात आल्याने पाण्यामुळे सुरु झालेल्या आंब्रेला फॉलने पर्यटकांच्या आनंदात भर घातली आहे.
परिसरात जोरदार वारे वाहत असल्याने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. घाटघर येथे १८० मिलीमीटर पाऊस पडला. रतनवाडी येथे १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाकी परिसरातही १५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा क्षेत्रात साडे सहा इंच पाउस पडला आहे. या पावसामुळे नवीन पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता ८ हजार ८५० दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. भंडारदरा धरणातून वीजनिर्मितीसाठी ४१९ कुसेकणे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला आंब्रेला फॉलचा नियम पाळून आनंद घ्यावा. पर्यटकांनी धिंगाणा मस्ती घालू नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. – अभिजित देशमुख, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग भंडारदरा
Web Title: Bhandardara dam is 80 percent full