अहमदनगर: भरदुपारी चाकूचा धाक दाखवत ७ लाख लुटले
Ahmednagar News: पाचेगाव फाटा : भरदुपारी अडीचच्या सुमारास दुचाकी चालकास दोघांनी चाकूचा धाक दाखवून सात लाखांस लुटल्याची (robbed) घटना.
नेवासा | Nevasa : श्रीरामपूर- नेवासा मार्गावरील पाचेगाव फाटा (ता. नेवासा) येथे गुरुवारी (दि. २०) भरदुपारी अडीचच्या सुमारास दुचाकी चालकास दोघांनी चाकूचा धाक दाखवून सात लाखांस लुटल्याची घटना घडली. एक व्यक्ती सात लाख रुपये पाचेगाव येथील घरी घेऊन जात असताना हा प्रकार घडला.
संदीप गणपतराव फुगे (रा. पाचेगाव, ता. नेवासा) असे लूट झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फुगे यांनी गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथील केला. मावसभाऊ प्रसाद कोकणे यांच्याकडे ठेवलेले तीन लाख रुपये घेतले. नंतर महाराष्ट्र बँकेच्या टाकळीभान शाखेतून दोन टप्प्यांत प्रत्येकी दोन लाख, असे एकूण सात काढले.
सर्व सात लाख रुपये घेऊन ते घरी पाचेगावकडे निघाले होते. टाकळीभानवरून पाचेगाव फाटा ओलांडून पाचेगावच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना संदीप फुगे यांचा एका बिगर क्रमांकाच्या दुचाकीवरील तिशीतील वयाच्या दोघा जणांनी पाठलाग केला. बेलपिंपळगाव – पाचेगाव शिवेजवळ येताच दुचाकी आडवी लावली. चाकूचा धाक दाखविला. फुगे यांच्याजवळील सात लाख रुपये असलेली पिशवी हिसकावली. फुगे यांचा मोबाइल दगडावर फोडून सर्व रक्कम घेऊन त्या दोघांनी पोबारा केला.
घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत संदीप फुगे यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस रुपये ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक थोरात करीत आहेत.
Web Title: Bhardupari robbed 7 lakhs at knifepoint
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App