उपचाराच्या नावाखाली भोंदू बाबाचे अजब प्रताप, महिलेवर बलात्कार
Virar Rapes Case: भोंदू बाबाने उपचाराच्या नावाने महिलेची फसवणूक करुन महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.
विरार : भोंदू बाबाने उपचाराच्या नावाने महिलेची फसवणूक करुन महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. महिलेवर बलात्कार करणारा नराधम भोंदूबाबा रामपलट राजभर याच्याविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
विरार परिसरात राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेला पोटदुखीचा त्याचप्रमाणे मानसिक त्रास होता. महिलेला असलेला त्रास बरा होत नसल्याने परिसरात असलेल्या भूतबाध उतरवणे, गुप्तधन शोधून देतो, पैशाचा पाऊस पडतो व सर्व आजारांचा इलाज करण्याचा दावा करत करणाऱ्या रामपलट राजभर नावाच्या भोंदू बाबाकडे उपचारासाठी गेली. हा भोंदू बाबा फुले विकण्याचा देखील व्यवसाय करत असून त्या आड भोंदूगिरी करत आपला गोरखधंदा चालवत होता. पीडित महिलेवर मांत्रिक जादूटोणा मंत्रोच्चार करून उपचार करत होता. मे महिन्यात महिला त्याच्याकडे उपचारासाठी गेली असता त्याने महिलेला पाणी पिण्यास दिले. ते पाणी पिल्यानंतर महिलेला गुंगी आली यावेळी या भोंदू बाबाने आरोपी महिलेवर बलात्कार केला.
महिलेसोबत झालेला हा प्रकार तिच्या पती समजल्यानंतर विरार पोलीस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी रामपलट राजभर या भोंदू बाबाविरोधात विरार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 376 (2) एनसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्याच्या कलम 3 (1) (2) अन्वये पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी भोंदू बाबा रामपालट राजभर याला विरार पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: Bhondu Baba rapes a woman in the name of treatment
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News