Home कोपरगाव विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले पण तुटला पिंजरा, अन् पुढे घडलं असं…

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढले पण तुटला पिंजरा, अन् पुढे घडलं असं…

Breaking News | Ahmednagar: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाचे पथक बाहेर काढताना पिंजरा मोडकळीस आलेला असल्याने बिबट्याने पिंजरा तोडून परिसरातील शेतात धूम ठोकली.

Bibatya in the well was pulled out but the cage was broken

कोपरगाव : विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाचे पथक बाहेर काढताना पिंजरा मोडकळीस आलेला असल्याने बिबट्याने पिंजरा तोडून परिसरातील शेतात धूम ठोकली आहे. हा प्रकार कोपरगाव तालुक्यातील भोजडे शिवारातील घनगाव वस्ती येथे घडला आहे.  ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वनविभागाच्या गलथान कारभारामुळे प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही मात्र वन विभागाच्या कामकाजावर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोखंडी पिंजरा आणण्याऐवजी मोडकळीस आलेला लाकडी पिंजरा का आणला? असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील घनघाव वस्ती येथे गौतम घनगाव यांच्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली होती. गावकऱ्यांनी बिबट्याचा जीव वाचायला हवा, यासाठी विहिरीमध्ये दोरीच्या साह्याने बाज टाकली जेणेकरून बाजीच्या सहाय्याने बिबट्याला पाण्यात बुडण्यापासून वाचवता येईल आणि बिबट्याला सुखरूप वन विभागाकडे सोपवता येईल. मात्र वनविभागाने आणलेला निकृष्ट दर्जाच्या पिंजऱ्यामुळे थेट पिंजरा तुटल्याने बिबट्या सिनेस्टाईल पसार झाला.

Web Title: Bibatya in the well was pulled out but the cage was broken

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here