Home Breaking News संगमनेरमध्ये बिबट्याची दहशत; पती-पत्नीवर हल्ला

संगमनेरमध्ये बिबट्याची दहशत; पती-पत्नीवर हल्ला

Breaking News | Sangamner Bibatya attack: बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले.

Bibatya terror in Sangamner Attack on husband and wife

संगमनेर: संगमनेरमधील घुलेवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी झाले असून ठकुबाई पानसरे गंभीर जखमी आहेत. परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी परिसरातील पांढरीचा मळा येथे पती पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ठकुबाई भाऊसाहेब पानसरे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात तसेच शहरालगतच्या परिसरातही बिबटे दिसण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने बिबटे बाहेर पडत असल्याची स्थानिकांची माहिती आहे. परिसरात वनविभागाने गस्त वाढवावी तसेच अत्यावश्यक ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Breaking News: Bibatya terror in Sangamner Attack on husband and wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here