घारगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद
Sangamner News: दोन ते अडीच वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद, रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास.
संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते अडीच वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ती मादी असून, तिला संगमनेर खुर्दच्या रोपवाटिकेत नेले आहे.
घारगावजवळ शिदायकवाडी परिसरात दोन ते तीन बिबटे असल्याचे ग्रामस्थांच्या वेळोवेळी निदर्शनास आले. सुनीता जाधव यांच्या वस्तीशेजारी याच बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाधव वस्तीजवळ पिंजरा लावला होता. भक्ष्याच्या शोधात असलेला तो बिबट्या रविवारी रात्री अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला
बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच रहिवाशांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. वनपाल हारुण सय्यद, वनसंरक्षक श्रीकिसन सातपुते, बाळासाहेब वैराळ, दीपक वायळ आदींनी या बिबट्याला संगमनेर खुर्द येथील रोपवाटिकेत हलविले.
Web Title: Bibtya hat was making noise in Ghargaon was finally imprisoned in a cage
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App