मोठा निर्णय: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात
LPG GAS Price: एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात.
नवी दिल्ली : रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल.
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना २०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. उज्जवला योजनेत आधीच अनुदान म्हणून २०० रुपयांचा लाभ दिला जातो. अशा प्रकारे आता त्यांना ४०० रुपये सबसिडी दिली जाईल. केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठाकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आता निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल व डिझेल च्या दरात देखील कपात होण्याची शक्यता आहे.
Web Title: Big reduction in price of domestic LPG GAS Price
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App