Home अकोले अकोले तालुक्यातील शैक्षणिक मोठे झाड म्हणजे सत्यनिकेतन संस्था- स.पो.नि. प्रविण दातरे

अकोले तालुक्यातील शैक्षणिक मोठे झाड म्हणजे सत्यनिकेतन संस्था- स.पो.नि. प्रविण दातरे

Rajur News:  शिक्षणाचे रोपटे लावण्याचे काम गुरुवर्य रा. वि. पाटणकर यांनी केले.

big tree of education is Satyaniketan Sanstha

राजूर: १९५६ चा काळ डोळ्यासमोर आणला तर तर तो किती कठीण असेल याची कल्पना आपण करू शकतो आणि त्यावेळी शिक्षणाचे रोपटे लावण्याचे काम गुरुवर्य रा. वि. पाटणकर यांनी केले.  या आदिवासी भागात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य  पाटणकर यांनी केले आहे. या भागातील विद्यार्थी घडत आह. प्रगती करत आहे.  अकोले तालुक्यातील शिक्षण हे फोफसंडी येथील जसे फुले फुलतात तसे तालुक्यातील शैक्षणिक वातावरण पवित्र आहे.  यातच मोठे झाड म्हणजे सत्यानिकेतन संस्था आहे. असे प्रतिपादन राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी केले.

आज सत्यनिकेतन संस्था आयोजित कै.रा.वि.पाटणकर स्मृतिचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा राजूर येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे  हे १० वे वर्ष होते.  स्पर्धेचे उद्घाटन राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मा. प्रविण दातरे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सदर स्पर्धेसाठी तालुक्यातील दोन्ही गटात मिळून ८२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. अत्यंत निरपेक्षपणे स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील परीक्षक स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे संचालक मिलिंद उमराणी, माजी प्राचार्य एम.के. बारेकर, व्यवस्थापक प्रकाश महाले,  प्राचार्य बी.के. बनकर, उप प्राचार्य ए. एफ धतुरे तसेच तालुक्यातील विद्यालयांचे शिक्षक उपस्थित होते. 

प्रविण  दातरे पुढे म्हणाले की, वकृत्व अशी कला आहे की, ज्यामुळे मोठ मोठे व्यक्तीमत्व घडलेले  आहे. वकृत्व कलेमुळे आपल्या भावना, विचार इतरांपर्यंत पोहचू शकतो. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

आनंदाची गोष्ट म्हणजे स्पर्धा २०१४ सालापासून सुरु झालेली असून तेव्हापासून प्रतीक्षेत असलेल्या सर्वोदय विद्यालय राजुरने हा सांघिक चषक पटकाविला आहे.  इ. ५ वी ते ७ वी गटामध्ये इ. ७ वी तुकडी क या व वर्गातील विघार्थिनी कु. महाले पलक जगदिश या विद्यार्थिनीने वरील गटामध्ये सांघिक चषक मिळवून दिला. स्पर्धेच्या या यशासाठी सर्व संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.


स्पर्धा निकाल

गट- १ (इ.५वी ते ७वी)

प्रथम क्रमांक

कु.महाले पलक जगदीश (सर्वोदय विद्या मंदिर राजूर )

द्वितीय  क्रमांक

कु.राऊत कस्तूरी दीपक (वसुंधरा अकॅडमी  अकोले)

तृतीय क्रमांक

कु.आरोटे ईश्वरी बाळासाहेब

 (सह्याद्री  विद्यालय ब्राह्यणवाडा )


गट – ०२  (इ. ८ वी ते १० वी.)

प्रथम क्रमांक

 कु. एखंडे मानसी राजाराम  (अंबिका विद्यालय टाहाकारी)

द्वितीय क्रमांक

कु. आरोटे तनुजा रविंद्र (सावित्रीबाई फुले  माध्य. विद्यालय कोतुळ )

तृतीय क्रमांक

चि.पराड साईराज त्रिबंक (सर्वोदय विद्या मंदिर खिरविरे)

Web title: big tree of education is Satyaniketan Sanstha

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here