जेवणानंतर बिनसले पती-पत्नीने घेतला सोबत गळफास घेत आत्महत्या
Beed News: दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).
बीड | जातेगाव : गावभर चक्कर मारल्यानंतर सकाळी १० वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर दोघा नवरा बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. यात दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात उघडकीस आली.
राजू बंडू चव्हाण (वय ३१) व सोनाली राजू चव्हाण (वय २८, रा. जातेगाव, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या पती पत्नीची नावे आहेत. राजू हे नाशिकला असतात. मागील आठवड्यात ते सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. मंगळवारी सकाळीही राजू घराबाहेर पडले. घराच्या बाहेरच असलेल्या मराठा आंदोलनस्थळी त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते घरी गेले. घरी पती-पत्नीसह दोन मुलींनी सोबत जेवणही केले. परंतु त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दोघांनीही राहत्या घरातच आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यानंतरही आई-पप्पा बाहेर येत नसल्याने मुलांनी दरवाजा वाजविला; परंतु आतून काहीच आवाज न आल्याने मुले ओरडली. त्यानंतर गावातील लोकांनी धाव घेतली. घरावरील पत्रे काढून आत प्रवेश केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह खाली उतरवून तलवाडा पोलिसांना संपर्क केला. जातेगाव आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
Web Title: Binsale committed suicide by hanging herself with her husband and wife
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App