Home अकोले अकोले: भाजपच्या नगरसेवकाने काढली आठवीच्या विद्यार्थिनीची छेड, नगरसेवकावर गुन्हा दाखल

अकोले: भाजपच्या नगरसेवकाने काढली आठवीच्या विद्यार्थिनीची छेड, नगरसेवकावर गुन्हा दाखल

Breaking News | Akole Crime: अकोलेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपाकडून अकोले नगरपंचायतीवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेला हितेश कुंभार याने इयत्ता आठवीच्या मुलीची छेडछाड काढल्याची धक्कादायक.

BJP corporator molested a student of class VIII, a case was registered against the corporator

अकोले: भाजपाकडून अकोले नगरपंचायतीवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेला हितेश कुंभार याने इयत्ता आठवीच्या मुलीची छेडछाड काढल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे.बदलापूरची घटना ताजी असताना महाराष्ट्रामध्ये मुलींच्या छेडछाडीच्या तसेच अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसून येत आहेत.

भाजपाकडून अकोले नगरपंचायतीवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेला हितेश कुंभार याने इयत्ता आठवीच्या मुलीची छेडछाड काढल्याची धक्कादायक व लाजिरवाणी घटना समोर आलेली आहे.भाजपकडून अकोले नगरपंचायतीवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेला हितेश कुंभार यांनी इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची छेडछाड काढल्याची धक्कादायक बाब समोर आली असून तू मला फार आवडतेस असे बोलून तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.

हा सगळा प्रकार क्लासच्या शिक्षिकेने पाहिला व एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारानंतर मुलगी पूरती घाबरून गेली व तिने हा सगळा घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यानंतर त्या मुलीला धिर देण्यात आला व त्यानंतर नगरसेवक हितेश कुंभार यांच्यावर काल अकोले पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हितेश कुंभार याने शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी साधारणपणे साडे सात वाजेच्या दरम्यान हे भयानक कृत्य केले. पिडीत मुलगी ही क्लासला गेलेली होती व संध्याकाळी साडेसातला तिचा क्लास सुटल्यानंतर ती घरी जायला निघाली. जेव्हा ती घरी जायला निघाली तेव्हा तिच्याजवळ हितेश कुंभार आला व तू मला फार आवडतेस असे बोलून तिच्या अंगावरून हात फिरवला व तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या प्रकारानंतर त्या मुलीने हाताला झटका देऊन ती घाबरली व तिथून पळत सुटली. हा सगळा प्रकार कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी क्लासच्या तिसऱ्या मजल्यावरून पाहिल्यानंतर त्याखाली आल्या तोपर्यंत मुलगी घराकडे गेली होती व हितेश कुंभार कुठे आडोशाला जाऊन लपला.

हा सगळा प्रकार त्या मुलीने भेदरलेल्या अवस्थेत रडत रडत वडिलांना सांगितला व वडिलांनी कुठलाही वेळ न दवडता मुलीला सोबत घेतले व क्लास गाठले. जेव्हा मुलीचे वडील क्लासच्या परिसरामध्ये आले तेव्हा हितेश कुंभार हा तिथेच होता. मुलीच्या वडिलांनी हितेश कुंभार ला पाहिल्यानंतर त्याला जाब विचारला व तु एक जबाबदार नागरिक आहेस व असे कृत्य तुला शोभते का? असा जाब विचारल्यानंतर मात्र तो काही न बोलता त्या ठिकाणाहून परागंदा झाला.

या सगळ्या प्रकारानंतर मुलगी मात्र पूरती घाबरून गेली होती व या नगरसेवकाच्या विषयी तिच्या मनात प्रचंड चीड निर्माण झालेली होती. त्या मुलीला अक्षरशा क्लासला जायची देखील भीती वाटत होती.त्यामुळे मुलीच्या वडिलांनी पावले उचलत नगरसेवकाला शिक्षा झालीच पाहिजे असे ठरवले व काल पीडित मुलीची मानसिकता ठीक झाल्यानंतर मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवक हितेश कुंभार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: BJP corporator molested a student of class VIII, a case was registered against the corporator

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here