संगमनेरात भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल
Sangamner Crime: मारहाण प्रकरणी दोन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेर : केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान हे संगमनेरातील सत्काराचा कार्यक्रम आटोपून गेल्यानंतर शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दीपक भगत यांना मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे दि. २ जानेवारी रोजी रात्री संगमनेर येथे शासकीय विश्रामगृहात काही वेळ थांबले होते. सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर ते गेले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दीपक भगत हे शासकीय विश्रामगृहाच्या वरच्या मजल्यावरून खाली उतरत असताना त्यांना सुयोग पंढरीनाथ गुंजाळ राहणार गुंजाळवाडी याने मागून जोराचा धक्का दिला. मला धक्का मारू नका कमरेला त्रास होतो आहे, असे सांगून बघत खाली उतरले. घरी जाण्यासाठी ते आपल्या दुचाकीवर बसले असता तेथे सुयोग गुंजाळ व राहुल भोईर हे आले. त्यांनी भगत यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांना गाडीवरून ढकलून देऊन लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्रास होऊ लागल्याने ते शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पोलिसांनी त्यांचा रुग्णालयात जबाब घेतला. भगत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुयोग गुंजाळ व राहुल भोईर यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली.
Web Title: BJP official was beaten up in Sangamner a case was registered
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News