Home पुणे मृतदेह बाथरूममध्ये टाकून आतून लावला दरवाजा! महिला मृतावस्थेत सापडली

मृतदेह बाथरूममध्ये टाकून आतून लावला दरवाजा! महिला मृतावस्थेत सापडली

Breaking News | Pune Crime: बाथरूममध्ये महिला मृतावस्थेत सापडली. पोलिसांनी उलगडले रहस्य: प्रियकराला अटक.

body in the bathroom and closed the door! The woman was found dead body

पुणे : घराचा दरवाजा आतून बंद होता, बाथरूमचा दरवाजाही आतून बंद. अशात बाथरूममध्ये महिला मृतावस्थेत सापडली. शवविच्छेदनात तिचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. आतून बंद असलेल्या बाथरूममध्ये दुसरा जाऊन तिचा खून कसा करेल, हे रहस्य पोलिसांसमोर उभे राहिले. चौकशीत या खुनाचा उलगडा झाला.

मुलीबरोबरच्या प्रेमसंबंधांना विरोध केल्याने तरुणाने कुत्र्याला बांधण्याकरिता असलेल्या बेल्टने गळा आवळून आईचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिवांशु दचाराम गुप्ता (वय २३, रा. प्रतीकनगर, येरवडा) याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे वर्षा क्षीरसागर (५८. रा. माउंटव्हर्ट अॅल्टसी, पाषाण) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार १८ जानेवारी रोजी मध्यरात्री घडला

प्रेमसंबंधांना नकार दिल्याने काढला काटा

याबाबत क्षीरसागर यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी यांचे ७ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, दोघांमध्ये वाद होत असल्याने फिर्यादीने प्रेमसंबंधास नकार दिला. तसेच, फिर्यादीची आई वर्षा हिनेही प्रेमसंबंध ठेवायचे नाही, असे सांगितल्याने शिवांशु चिडला होता. यातूनच वर्षा या घरी एकट्या असल्याचे पाहून शिवांशु घरी आला आणि त्याने कुत्र्याला बांधण्याकरिता असलेल्या बेल्टने वर्षाचा गळा आवळून खून केला.

Web Title: body in the bathroom and closed the door! The woman was found dead body

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here