अहिल्यानगर: आठ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला
Breaking News | Ahilyanagar: कुकडीच्या हद्दीतील लोखारा ओढ्यावर गवतात बेवारस मृतदेह आढळून आला.
कुळधरण : श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील राहत्या घरातून देवदर्शनासाठी बाहेर पडलेले धोंडिबा कातोरे (वय ६०) यांचा आठ दिवसांनंतर बुधवारी (दि. ८) रुईगव्हाण . कर्जत) येथील कुकडीच्या हद्दीतील लोखारा ओढ्यावर गवतात बेवारस मृतदेह आढळून आला.
कातोरे बुधवारी (दि. १) घरातून दुचाकीवर सकाळी देवदर्शनासाठी घरच्यांना सांगून बाहेर पडले होते. संध्याकाळ झाली तरी ते घरी आले नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यात ते कोरेगव्हाण भागाच्या विसापूर कालवा हद्दीपर्यंतच दिसले. पुढे कालवा संपल्यानंतर पुढील भागाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी कुकडीच्या कालवा भागात शोधमोहीम सुरू केली. परंतु, कुकडी कालव्याला पूर्ण दाबाने पाणी वाहत असल्यामुळे त्यांचे प्रयत्न निरर्थक ठरले.
सोशल मीडियावर त्यांनी कातोरे हे बेपत्ता झाल्याची पोस्ट शेअर केली होती. तेथेही यश आले नाही. दरम्यान, कर्जत हद्दीतील कुकडी कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे त्यांनी कर्जत भागात सलग दोन दिवसांपासून शोधमोहीम सुरू केली. पाणी बंद होण्यापूर्वी कुकडीतून रुईगव्हाण येथील लोखारा ओढ्यात पाणी सोडल्यामुळे त्यांनी ओढ्याच्या काठाने पाहणी केली. तेथे जवळच गवतात कातोरे यांचा मृतदेह डोक्याला लागलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, हा कोणताही विपरीत प्रकार नसून, हा अपघात असल्याचे कातोरे यांचा मुलगा राजू कातोरे यांनी सांगितले. श्रीगोंदा भागात कुकडीचे पाणी सुरू असल्यामुळे त्यांची दुचाकी आढळून आली नाही. घटनास्थळी मिरजगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक रमेश मुलानी, सहायक फौजदार अनिल भोसले, सुनील माळशिकारे, पोलिस कर्मचारी विकास चंदन, पोलिस पाटील मधुकर चव्हाण यांनी भेट दिली.
Web Title: body of a person who had been missing for eight days was found
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News