Home अहमदनगर मुळा नदी पात्रात अज्ञाताचा मृतदेह आढळला, घातपात कि आत्महत्या?

मुळा नदी पात्रात अज्ञाताचा मृतदेह आढळला, घातपात कि आत्महत्या?

Breaking News | Ahilyanagar: मुळा नदी पात्रात अंदाजे ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

Body of unknown person found in Mula river bed, accident or suicide

राहुरी: राहुरी तालुक्यातील आरडगाव शिवारामध्ये मुळा नदी पात्रात अंदाजे ३५ वर्षे वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तात्काळ राहुरी पोलिसांनी धाव घेतली परिसराची पाहणी करून मृतदेह शिव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आरडगाव येथील काळे- देशमुख मुळा थडी परिसरात आज मंगळवार दिनांक.७ जानेवारी रोजी सकाळी येथील एका शेतकऱ्याला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस पाटील लक्ष्मण जाधव दिली.

सदर खबर राहुरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सुरेश सय्यद, संभाजी बडे, प्रविण खंडागळे, रोहित पालवे आदि पोलीस पथकाने धाव घेतली मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दुपारी उशिरापर्यंत मात्र मृतदेहाची ओळख पटली नव्हती. अंदाजे 35 ते 40 वयोगट असलेला व अंगावर निळा शर्ट व काळी पॅंट असा पेहराव असलेला हा इसम आहे.

Web Title: Body of unknown person found in Mula river bed, accident or suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here