Home जळगाव हृदयद्रावक! दोन्ही मुलांचे लग्न लावले अन् आईने मिटले डोळे

हृदयद्रावक! दोन्ही मुलांचे लग्न लावले अन् आईने मिटले डोळे

दोन्ही मुलांचे एकाच मांडवात लग्न उरकत आईने दुसऱ्याच दिवशी ईहलोकाचा निरोप (Death) घेतला.

Both the children were married and the mother closed her eyes Death

निपाणे | जळगाव: दोन्ही मुलांचे एकाच मांडवात लग्न उरकत आईने दुसऱ्याच दिवशी ईहलोकाचा निरोप घेतला. ही हृदयद्रावक घटना तालुक्यातील भातखेडे येथे बुधवारी घडली.

तालुक्यातील भातखेडे येथील हातावर पोट असलेल्या युवराज भिल व अनिता भिल यांनी आपल्या आकाश व शुभम या दोन्ही मुलांचे शुभमंगल आपल्याच दारात एकाच मांडवात धुमधडाक्यात लावले. मोठा मुलगा आकाशसाठी अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील तर शुभमसाठी चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील सुना त्यांनी आणल्या. लग्नाआधी १० रोजी गोंधळ, ११ रोजी लंगर असे दोन दिवस कार्यक्रम चालले. त्यानंतर १२ रोजी हळद व १३ रोजी शुभमंगल झाले. १४ रोजी हळद फेडल्यानंतर नवरदेवांची आई अनिता युवराज भिल (४५) यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने एरंडोल येथे खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Both the children were married and the mother closed her eyes Death

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here