अहिल्यानगर: सेल्फी काढताना शेततळ्यात बुडून मुलाचा मृत्यू
Breaking News Ahilyanagar : सेल्फी काढताना शेततळ्यात बुडून आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू. (Dies).
पाथर्डी : सेल्फी काढताना शेततळ्यात बुडून आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील देवी धामणगाव येथे गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ही घटना घडली. ते दोघे यात्रेसाठी पुण्याहून गावी आले होते.
आर्यन बाळासाहेब जाधव (वय १३) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आर्यन वडिलांसोबत देवी धामणगाव येथील शेतात गेला होता. तेथे असलेल्या शेततळ्यावर सेल्फी काढत असताना त्याचा मोबाइल पाण्यात पडला. मोबाइल काढण्याच्या प्रयत्नात आर्यन शेततळ्यात पडला. मुलाला बुडताना पाहून वडील बाळासाहेब जाधव यांनीही तत्काळ पाण्यात उडी घेतली. त्यांनी आर्यनला वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत आर्यनचा श्वास थांबला होता. या घटनेत बाळासाहेब जाधव ही पाण्यातच अडकले होते. त्यामुळे ते जखमी झाले. एका शेतकऱ्याच्या मदतीने शेततळ्यातून बाहेर काढले.
Breaking News: Boy dies after drowning in farm pond while taking selfie