Home अहिल्यानगर आईला मारहाण केल्याने  मुलाने पित्यावर झाडल्या तीन  गोळ्या

आईला मारहाण केल्याने  मुलाने पित्यावर झाडल्या तीन  गोळ्या

boy fired three shots at the father after beating the mother

अहमदनगर: आईला मारहाण केल्याने राग अनावर झाल्याने मुलानेच वडिलांवर तीन गोळ्या झाडल्या.आष्टी जि. बीड  येथील विनायकनगर भागांत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. यात वडील गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे.

किरण संतोष लटपटे असे मुळचे नाव आहे. नुकताच सैन्यातून निवृत्त झाला आहे. आष्टी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  संतोष किसन लटपटे असे या जखमी पित्याचे नाव आहे. घरगुती वादातून किरण याने वडील यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यामधील डोंगोल्या पोटावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. वडील संतोष यांना दारूचे व्यसन होते. घरात सातत्याने छोटे मोठे वाढ होत असत यातूनच हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संतोष हा तीन महिन्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाला होता, त्याच्याकडे बंदुकीचा परवाना होता. त्याचे वडील दारू पिऊन आईला मारहाण सुरु केली होती. त्यानंतर मुलाला राग अनावर झाल्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या असे आरोपीने जबाब दिला आहे.

Web Title: boy fired three shots at the father after beating the mother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here