Home महाराष्ट्र खळबळजनक! प्रियकराने केले ब्रेकअप, प्रेयसीने केला थेट चाकूने हल्ला

खळबळजनक! प्रियकराने केले ब्रेकअप, प्रेयसीने केला थेट चाकूने हल्ला

Crime News: प्रियकराने ब्रेकअप केल्यामुळे वैतागलेल्या प्रेयसीने थेट प्रियकरावर चाकूने हल्ला.

 

मुंबई : धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. प्रियकराने ब्रेकअप केल्यामुळे वैतागलेल्या प्रेयसीने थेट प्रियकरावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रियकर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रेयसीसोबतच तिचा सावत्र भाऊ आणि एका मित्राने मिळून प्रियकरावर चाकूने अनेक वार केले. प्रियकराच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शुक्रवारी नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन अंतर्गत उप्पलवाडी येथील एसआरके कॉलनीत घडली. गेल्या काही दिवसांपासून प्रियकराच्या वागण्यामुळे प्रेयसी वैतागली होती. प्रियकर तिच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून अजिबात बोलत नव्हता. त्याने तिच्यासोबत अचानक ब्रेकअप केले होते. यानंतर प्रेयसीने त्याला भेटण्यासाठी बोलावले होते.

भेटल्यानंतर बोलत का नाही? याची विचारणा प्रेयसीकडून करण्यात आली. प्रियकराकडून योग्य उत्तर मिळत नव्हती आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच प्रेयसीच्या सावत्र भावाने थेट प्रियकराच्या पोटात चाकुने वार केले. यानंतर आरोपी हा फरार झाला. यानंतर रस्त्यांनी जाणाऱ्या लोकांनी प्रियकराला वाचवत रूग्णालयात दाखल केले.

यानंतर या घटनेची माहिती ही पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. अजून दोन आरोपींचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. प्रियकरावर उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. लवकरच अटक कली जाईल असे पोलिसांनी सांगितलं आहे.

Web Title: Boyfriend broke up, girlfriend attacked directly with a knife

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here