धक्कादायक! प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, दोघेजण गावाहून पळून आले
Breaking News | Pune Crime: गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस. (Lovers murder and Suicide).
पुणे : नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध करण्यात आल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रेयसीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हडपसर भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचा चादरीने गळा आवळून खून करण्यात आला. तिचा खून करून प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी फिर्याद दिली आहे.
दोघेजण गावाहून पळून पुण्यात आले होते. हडपसर भागातील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील स्पॉटलाइट हॉटेलमध्ये दोघांनी खोली भाड्याने घेतली होती. आकाशने १३ मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. दोघेजण मृतावस्थेत सापडल्याची माहिती हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली आहे. मोनिका आणि आकाशचे प्रेमसंबंध होते. दोघेही नात्यातील आहेत. प्रेमसंबंधाला विरोध झाल्याने दोघेजण पुण्यात पळून आले होते. पोलीस निरीक्षक गिते अधिक तपास करत आहेत.
Web Title: Boyfriend’s suicide by killing his girlfriend
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study