Home Ahmednagar Live News दारूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी हप्त्याची मागणी, सहायक फौजदारावर गुन्हा

दारूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी हप्त्याची मागणी, सहायक फौजदारावर गुन्हा

Bribe Demand for Rs 10,000 installment to continue liquor business

कोपरगाव | Crime News: हॉटेल मध्ये अवैध दारू बाळगणे व दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी हप्ता(लाच) Bribe मागितल्याच्या कारणावरून सहायक फौजदार याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेल मध्ये त्यांना अवैध दारू बाळगणे व दारूचा अवैध व्यवसाय सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी हप्ता म्हणून १० हजार रुपयांची लाचेची मागणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रमेश राऊबा जगधने याने केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले.

दि. २८ जुलै रोजी दुपारी १२.३६ ते १.२१ वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सहाय्यक फौजदार रमेश राऊबा जगधने याने हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपीविरोधात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम स १९८८ चे कलम ७ प्रमाणे आरोपी सहाय्यक फौजदार रमेश जगधने यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यासह शहरात खळबळ उडाली आहे. 

Web Title: Bribe Demand for Rs 10,000 installment to continue liquor business

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here