Home अहमदनगर अहमदनगर: दीड लाखाची लाच, तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर: दीड लाखाची लाच, तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar News:  पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी दिड लाख रूपयांची लाच (Bribe) मागणार्‍या पेडगावच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केल्याची घटना.

bribe of one and a half lakh, Talathi in the net of bribery

श्रीगोंदा | Shrigonda:  बेकायदेशीर वाळु उपशासाठी वापरण्यात येणार्‍या व तक्रारदाराच्या शेतात लपवलेल्या पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी दिड लाख रूपयांची लाच मागणार्‍या पेडगावच्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले.

काशी केदार असे लाच मागणार्‍या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे पोकलेन मशिन काम झाल्यानंतर 10 जुलै 2023 रोजी रात्री 1.00 वाजता पेडगाव  येथील तक्रारदार यांच्या मित्राच्या शेतात उभे केले होते. दरम्यान पेडगावचे तलाठी काशी केदार व सर्कल डहाळे हे सदर पोकलेन लावले ठिकाणी आले. तक्रारदार यांना तुम्ही सदरचा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे सांगून तक्रारदार यांना तुमच्या पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी 3 लाख रूपये आम्हाला द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली.

11 जुलै 2023 रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तक्रारदार यांना भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे त्यांची लाच मागणीची वरील प्रमाणे तक्रार नोंदवली. त्यानुसार श्रीगोंदा येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान काशी केदार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2 लाख रूपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती दिड लाख लाच मागणी करून ती लाच रक्कम टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली. म्हणून आज 31 ऑगस्ट 2023 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकात पोलीस हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख, दशरथ लाड याचा समावेश होता.

Web Title: bribe of one and a half lakh, Talathi in the net of bribery

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here