Home अहमदनगर Ahmednagar:  भावाने केला बहिणीच्या प्रियकराचा खून, पसार पण चार तासांत पकडला

Ahmednagar:  भावाने केला बहिणीच्या प्रियकराचा खून, पसार पण चार तासांत पकडला

Ahmednagar News | Shrirampur:  बहिणीच्या प्रियकराचा खून (Murder) करुन पळून जात असलेल्या आरोपीस अवघ्या चार तासांत भोकर ते खोकर फाटा दरम्यान तालुका पोलिसांनी जेरबंद.

Brother murder sister's lover arrested him

 

श्रीरामपूर: तालुक्यातील भोकर येथून प्रेम प्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीच्या प्रियकराची भावाने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे सैराट चित्रपटाच्या कथानकाला उजळणी मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील इसारवाडी फाटा परीसरात बहिणीच्या प्रियकराचा खून करुन पळून जात असलेल्या आरोपीस अवघ्या चार तासांत भोकर ते खोकर फाटा दरम्यान तालुका पोलिसांनी जेरबंद करून वाळूंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

भोकर येथून काही वर्षापूर्वी गावातच राहणारा बाबासाहेब छबुराव खिलारी याने गावातीलच एका मुलीस फुस लावून पळवून नेल्याची चर्चा काही दिवस चालली. नंतर त्यावर विरजन पडले. परंतु काल गुरूवार दि.29 डिसेंबर रोजी दुपारी गावातील तरुणीला पळवून नेणार्‍या बाबासाहेब खिलारी यांची औरंगाबाद जिल्ह्यातील विसारवाडी फाटा परिसरात हत्या झाल्याची वार्ता गावात पोहचली. ही हत्या त्याने पळवून नेलेल्या तरुणीच्या भावाने केला असून तो श्रीरामपूरकडे आला व तालुका पोलिसात हजर झाल्याची चर्चा गावात सुरू होती.

औरंगाबाद येथे गुरुवारी (दि २९) सायंकाळी ५ वाजता एकाचा खून केल्याची घटना घडली. या घटनेतील आरोपी पसार झाला. त्यास अवघ्या चार तासांत श्रीरामपूर पोलिसांनी भोकर शिवारात उसाच्या शेतात पाठलाग करून ताब्यात घेतले.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

दि. २९ रोजी सायंकाळी पाच वाजता औरंगाबाद येथे बाबासाहेब छबूराव खिलारे (रा. भोकर) याचा सचिन शामराव नाटकर (रा. भोकर) याने खून केला. घटनेनंतर आरोपी सचिन नाटकर पसार झाला. आरोपी त्याच्या गावी भोकर येथे येत असल्याची खबर मिळताच औरंगाबाद पोलिसांनी श्रीरामपूर पोलिसांना कळविले. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी पथकासह सचिन नाटकर याचा शोध सुरू केला. भोकर ते खोकर फाटा परिसरात आरोपी श्रीरामपूरकडे जाणाऱ्या रोडवर दिसला. आरोपीस पोलिसांची चाहूल लागताच तो शेजारच्या उसाच्या शेतात पळून जात असताना त्याचा पाठलाग करून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याला मोटारसायकलसह वाळूज पोलिसांच्या ताब्यात दिले.

Web Title: Brother murder sister’s lover arrested him

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here