अहमदनगर ब्रेकिंग! इमारतीला आग, फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आग
Breaking News | Ahmednagar: इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आग (Fire) लागल्याची घटना.
अहमदनगर: मनमाड रोडवरील रोडवरीलसाई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने काही क्षणात ही आग विझवली. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नगर मनमाड रोडवरील साई मिडास (डौले हॉस्पिटल चौक) या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, दवाखाना तसेच फायनान्स कंपनीची कार्यालये आहेत या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना ही आहे. या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. मात्र काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला. ही बाब स्थानिकांनी महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली. अग्निशमन विभागाने तत्काळ बंब दाखल झाला आणि पाण्याच्या फवाऱ्याने ही आग विझवण्यात यश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला.
Web Title: Building fire, finance company office fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study