अहिल्यानगर: ईव्हीएमची वाहतूक केलेल्या एसटी बसमध्ये सापडले नोटांचे बंडल
Ahilyanagar Assembly Election 2024: मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एस.टी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चा रंगली. तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ.
अहिल्यानगर: अहिल्यानगरमध्ये ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या एसटी बसमध्येच नोटांचे बंडल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. एसटी बसच्या शीटखाली ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. यामुळे खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगावमध्ये ही घटना घडली असून एसटीतून विद्यार्थ्यांना हे पैसे सापडले. त्यांनी वाहकाकडे ते सोपवले.
मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एस.टी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चा रंगली आहे. एव्हढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या शिटखाली कशी आली? याचा तपास पोलीस करत आहेत.
कोपरगाव आगाराची ही बस दोन दिवसांपूर्वी स्ट्रॉंग रूम पासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव – वैजापूर – कोपरगाव अशा फेऱ्या मारल्या.
काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना विद्यार्थ्याला शेवटच्या शिटखाली सापडले नोटांचे दोन बंडल सापडले. यात तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Web Title: Bundle of notes found in ST bus carrying EVMs Assembly Election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study