संगमनेरात घरफोडी पावणे चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास
Breaking News | Sangamner Crime: बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल पावणे चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी येथील बालाजीनगरमधील बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल पावणे चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवार दि. १३ मार्च ते मंगळवार दि. १९ मार्चपर्यंत पहाटे तीन वाजेपर्यंत घडली आहे. आधीच दागिने चोरीच्या घटनांनी महिलांसह नागरिक भयभीत असताना पुन्हा ही घटना घडल्याने संगमनेर शहर पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की बालाजीनगर येथील दिगंबर विश्वनाथ देव्हारे (वय ६१) हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. याच संधीचा फायदा उठवून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील ७० हजार रुपये किंमतीचा ३.५० तोळे वजनाचा लॉकेटचा गोफ, ८० हजार रुपये किमतीच्या चार तोळे वजनाच्या बांगड्या, ४५ हजार रुपये किमतीची २.२५ तोळे वजनाची मोहनमाळ आणि ८० हजार रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे गंठण असे एकूण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे पावणे चौदा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत.
याप्रकरणी दिगंबर देव्हारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुरनं. २४६/२०२४ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार करत आहेत. दरम्यान, सतत दागिने चोरीच्या घटना समोर येत असल्याने शहर पोलिसांचा चोरट्यांवर धाकच नसल्याचे अधोरेखीत होत आहे.
Web Title: Burglary in Sangamner Fourteen tola gold ornaments looted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study