संगमनेरात घरफोडी, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
Breaking News | Sangamner Theft: घरफोडी झाली असून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि घरातील चीज वस्तू असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला
संगमनेर: संगमनेर शहर आणि घरफोड्या हे जणू सुत्रच बनले आहे. अधून मधून या चोऱ्या सुरूच असतात. बस स्थानकावरील पाकीट माऱ्या, घरफोड्या आणि चोऱ्या, दुचाकी चोऱ्या रोखण्यात पोलिसांना येणारे अपयश चिंताजनक आहे. संगमनेर शहरातील उपनगरात पुन्हा एकदा अशीच मोठी घरफोडी झाली असून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि घरातील चीज वस्तू असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
शहरातील गणेश विहार कॉलनी येथे संदीप कानकाटे यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून रात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटामधील साड्यांच्या खाली ठेवलेल्या चाव्यांनी लॉकर उघडून सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम चांदीचे देव, एलईडी टीव्ही आणि इतर पितळी वस्तू असा एकूण ३ लाख ६४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
संदीप राजाराम कानकाटे, (मूळ राहणार लोहारे कासारे, हल्ली राहणार गणेश विहार कॉलनी, संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली आहे.
Web Title: Burglary in Sangamner, three and a half lakhs in compensation theft
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study