शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जाताना कसारा घाटात बसचा अपघात
Accident: बसचे ब्रेक फेल झाल्याने ती बंद पडलेल्या वाहनावर जाऊन आदळल्याने हा अपघात, १० प्रवासी जखमी.
इगतपुरी : मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या खासगी बसला नवीन कसारा घाटात अपघात झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने ती बंद पडलेल्या वाहनावर जाऊन आदळल्याने हा आपघात होऊन यात दोन प्रवासी गंभीर व आठ किरकोळ जखमी झाले.
यवतमाळहून निघालेली ही बस ( एमएच ०४ एफके ०३९९) मंगळवारी (दि. २४) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास कसारा घाटातून जात असनाना बसचे ब्रेक फेल झाले. त्याचवेळी पुढील ट्रक (सीजी ०४ जेडी ९२०५) थांबल्याने त्याच्यामागे असलेला छोटा हत्ती टेम्पोही (एमएच ०४ एलई ०२३१) थांबला. मात्र, बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस टेम्पो व ट्रकवर धडकली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग, आपत्ती व्यवस्थापन टीमच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या व टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकांमधून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी महामार्ग सुरक्षा पोलीस अधिकारी हरी राऊत, साहेबराव पवार, पोलीस पथक व रुग्णवाहिका चालक कैलास गतीर आदींसह मुंबई नाशिक एक्स्प्रेस वेचे रूट पेट्रोलिंग अधिकारी रवी देहाडे, सहकारी दीपक मावरिया, सचिन भडांगे, संदीप म्हसणे, भाऊ पासलकर, सुदाम शिंदे आदींनी मदतकार्य केले.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
शम्मा बेद (वय ३५), सना शेख (वय १४, रा. घाटाजी, यवतमाळ), रुबिना शेख (वय ३८), परवीन बानू कलीम शेख (वय ३५), आसमा शेख जुबेर (वय २५), उबेद खान (वय १६) हसीना शेख इकबाल (वय ५०, सर्व रहाणार यवतमाळ)
Web Title: Bus accident at Kasara ghat while going to Shinde group Shiivsenameeting
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App