Home Maharashtra News Accident: बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात, चालकाचा मृत्यू, २५ जखमी

Accident: बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात, चालकाचा मृत्यू, २५ जखमी

Parbhani Accident News:  बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात.

Bus and travel accident, death of driver

परभणी: गंगाखेड परळी रस्त्यावरील करम पाटील जवळ बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. सात जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एसटी चालक हनुमंत व्हावळे हे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामधील जखमी झालेल्यांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड, अंबाजोगाई  आणि परभणी येथे हलवण्यात आले. या अपघातामधील दहा जखमींना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळताच गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच जखमी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मदत केल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.

Web Title: Bus and travel accident, death of driver

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here