Home क्राईम संगमनेर बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एकावर ओढले संकट

संगमनेर बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एकावर ओढले संकट

Sangamner Theft News:  बसमध्ये बसत असताना अज्ञात इसमाने प्रवाशाच्या गळ्यातील ४५ हजार रुपयाची सोन्याची चैन लांबविल्याची घटना.

bus at Sangamner Bus Stand, one was in gold chain theft

संगमनेर: संगमनेर बस स्थानकात बसमध्ये बसत असताना अज्ञात इसमाने प्रवाशाच्या गळ्यातील ४५ हजार रुपयाची सोन्याची चैन लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सोपान नारायण फापाळे (वय 63, रा. घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम, मुळ रा. बेलापुर, ता. अकोले) हे बुधवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास संगमनेर बस स्थानकावर आले होते. ते संगमनेर-हिवरगाव आंबरे बसमध्ये चढत असतांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कुणीतरी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेत चोरुन नेली.

याबाबत सोपान फापाळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 664/2022 भारतीय दंड संहिता 379 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे करत आहे.

Web Title: bus at Sangamner Bus Stand, one was in gold chain theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here