धक्कादायक! बस पेटली, एका प्रवाशाचा अक्षरशः कोळसा
Breaking News | Satara Bus Burn: भीषण अपघात, भरधाव बसला व दुचाकीला अज्ञात मोटारीने चकवा दिल्याने दुचाकीस्वार बस खाली येऊन दुचाकी जळाल्याने दुचाकी स्वार जळून खाक.
सातारा: पुणे सातारा महामार्गावर पाचवड (ता.वाई) गावच्या हद्दीत त्र॔बकेश्वरहुन पलुसकडे जाणाऱ्या भरधाव बसला व दुचाकीला अज्ञात मोटारीने चकवा दिल्याने दुचाकीस्वार बस खाली येऊन दुचाकी जळाल्याने दुचाकी स्वार जळून खाक झाला. यामुळे बसला ही आग लागली. प्रसंगावधान राखून बस चालकाने बस प्रवाशांना खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी उशिरा घडली.
याबाबत माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर पलूस बस सातारा कडे जात असताना पाचवड गावच्या हद्दीत डॉ भट यांच्या पेट्रोल पंपा समोर अज्ञात मोटारीने पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला आणि बसला चकवा दिल्याने दुचाकी चालक बस खाली आला. यामुळे दुचाकी भरधाव बस बरोबर दोनशे फूट पुढे घसटत गेली. त्यामुळे दुचाकीची पेट्रोलची टाकी फुटून दुचाकी स्वार जळाला. त्याबरोबरच एसटी बसला ही आग लागली. तात्काळ भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाने आग विझवली. बस चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना संकटकालीन दरवाजातून खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. बस मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. या घटनेची नोंद भुईंज पोलिसात झाली आहे.
Web Title: bus burst into flames, literally burning a passenger
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study