42 विद्यार्थी आई – बाबांचा निरोप घेऊन सहलीला गेले; पण परतीच्या प्रवासात बस पुलावरून कोसळली अन्…
Breaking News | Accident: महामार्गावर कराड तालुक्यात वाठार गावाजवळ बसला भीषण अपघात झाला. या बसमध्ये 42 विद्यार्थीसह शिक्षक जखमी झाले. पुलावर आली तेव्हा ती खोल दरीत कोसळली.

नाशिकमधील कॉलेजमधल्या 42 विद्यार्थ्यांसह शिक्षकांची एक बस सहलीसाठी कोकणात गेली होती. कोकणात मजा मस्ती केल्यानंतर परतीच्या प्रवासात या बसला भीषण अपघात झाला.
कोकणातून परताना पुणे – बंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यात वाठार गावाजवळ बसला भीषण अपघात झाला. या बसमध्ये 42 विद्यार्थीसह शिक्षक जखमी झाले आहेत.
पुणे बंगळुरू महामार्गावर काम सुरु आहे. अशात जेव्हा ही सहलीची बस या पुलावर आली तेव्हा ती खोल दरीत कोसळली. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
या बसमधील जखमींना जवळच्या दोन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 10 जणांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणि 32 जणांना कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 4 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण आणि महामार्ग मदत केंद्राच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटस्थळी धाव घेतली आणि मदत केली. त्यासोबत वाठार ग्रामस्थांनी त्यांना मदत केली त्यामुळे जखमींना वेळ रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार वाठार गावाच्या जवळ भराव पुलाचं काम सुरु आहे. अशात ही बस पहाटेच्या अंधारत बस चालकाचे नियंत्रण गेलं आणि हा अपघात झाला. बस चालकाला रस्त्याचा अंदाज नसल्याने या पुलावरून ही बस कोसळली.
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगावमधील बी. पी. पाटील महाविद्यालयाचे हे विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले होते. सहलीचा आनंदात असताना परतीच्या प्रवासात मंगळवारी पहाटे बसला भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच अनेक पालकांनी वाठार गाव गाठून रुग्णालयात गर्दी केली आहे. पालकांना पाहून विद्यार्थांना आधार मिळाला आहे.
Breaking News: bus met with a terrible accident. 42 students and teachers were injured

















































