Home अहमदनगर संगमनेरातील व्यावसायिकाची प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्या

संगमनेरातील व्यावसायिकाची प्रवरा नदीत उडी घेऊन आत्महत्या

Breaking News | Sangamner Suicide:  किराणा दुकानदार व्यावसायिकाने प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

businessman in Sangamner committed suicide by jumping into Pravara river

संगमनेर : शहरातील किराणा दुकानदार व्यावसायिकाने मंगळवारी (दि. 1) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की श्याम अंबादास सिरसुल्ला (वय 52, रा. मालदाड रोड, संगमनेर) यांचे इंदिरानगरमध्ये वैभव प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांनी साधारण दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पुलावरुन प्रवरा नदीपात्रात उडी मारत आत्महत्या केली. त्यानंतर दोन तासांनी एक किलोमीटर अंतरावरील खराडी शिवारात अडीच वाजेच्या सुमारास काही तरुणांना अज्ञात इसम मृतावस्थेत वाहून येत असल्याचा दिसला. त्यांनी सदर मृतदेह काठावर आणून त्यांची छायाचित्रे समाज माध्यमांवर टाकली.

त्यानंतर काही वेळातच मृतदेहाची ओळख पटली. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्यचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: businessman in Sangamner committed suicide by jumping into Pravara river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here