संगमनेरचा कॅफे मालक अत्याचार प्रकरणी अटकेत
Sangamner News: संगमनेर येथील कॅफे चालकासही अटक (Arrested) करण्यात आली.
संगमनेर: महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी मैत्री करत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दोघां तरुणांसह नांदूर शिंगोटे व शिर्डी येथील लॉज मालकास अटक केली आहे. तर संगमनेर येथील कॅफे चालकासही अटक करण्यात आली. त्यामुळे आता अत्याचार प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच झाली. संगमनेर शहरातील महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शहरातील कॅफे तसेच नांदूर शिंगोटे व शिर्डी येथील लॉजवरती किरण सोपान राऊत व आशिष नानासाहेब राऊत या दोघांनी वेळोवेळी अत्याचार केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी दोघा नराधमांसह चार सहआरोपी व सहा ते सात जणांवरती पोक्सो कायदे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. किरण आणि आशिष राऊत यास अटक केली होती. त्यानंतर नांदूरशिंगोटे येथील साई तेज लॉजचा चालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर, शिर्डीचा लॉज चालक आकाश भास्कर बोंडारे या दोघांना याप्रकरणी सह आरोपी करत त्यांना अटक केली आहे, हे चारही जण सध्या पोलीस कोठडीत आहे
या प्रकरणातील संगमनेरचा कॅफे क्रश बक्सचा मालक राहुल गौतम भालेराव, ( रा. भालेकर वस्ती मालदाड, संगमनेर) याला देखील तपासी अधिकारी निवांत जाधव यांनी मंगळवारी अटक केली. भालेराव यास पोलिसांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर हजर केले असता त्यास एकदिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणशातील अजून दोन जण पसार असून त्यांचाही पोलीस कसून शोध घेत आहे.
Web Title: Cafe owner of Sangamner arrested in rape case
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App