प्रेयसीला बोलावून केला खून, स्वतः घेतला गळफास
Murder Case: दुसरीकडे लग्न जुळल्याने होता नाराज, ‘तू मेरी नहीं तो किसी की नहीं’ म्हणत आवळला गळा (Murder)
गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःच त्याने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
श्रीकांत महादेव कापगते (वय २२), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची प्रेयसी टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२) हिचा त्याने गळा आवळून खून केल्यानंतर त्याने स्वतःच गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
श्रीकांतचे वडील महादेव कापगते (५२) हे शनिवारी सकाळी १० वाजता शेताकडे पाणी पाहायला गेले होते. त्यांना बाजूच्या शेतात पळसाच्या झाडाला फासावर श्रीकांत लटकलेला दिसला. श्रीकांत व टिकेश्वरी यांचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या संबंधातून ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असे स्वप्न रंगवीत असताना टिकेश्वरीचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत जोडण्यात आले. तेव्हापासून श्रीकांत चिंतेत होता. ती आपली व्हावी यासाठी तिला तो विनवणी करायचा; परंतु घरच्यांच्या समोर आपण बोलू शकणार नाही, असे टिकेश्वरीचे म्हणणे होते.
२२ डिसेंबर रोजी श्रीकांतने टिकेश्वरीला आपल्या गावाला आणले. शेताकडे एकांतवास मिळेल म्हणून त्याने तिला शेतात नेले. लग्नाचा हट्ट केला; परंतु टिकेश्वरीने त्याचे न ऐकल्यामुळे त्याने तिचा गळा आवळून खून केला. नंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी श्रीकांत महादेव कापगते या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Called his girlfriend and Murder hanged himself
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App