Home Maharashtra News समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जण ठार

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जण ठार

Samruddhi Highway Accident: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर अर्टिका गाडीचा हा अपघात झाल्याची घटना.

car accident on Samriddhi highway, 6 members of the same family killed

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून  पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉरवर अर्टिका गाडीचा हा अपघात झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, या वाहनातून अकरा जण प्रवास करत होते, तर यातील सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व प्रवासी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून, शेगावकडे निघाली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याहून शेगावकडे निघालेल्या कारचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ सिवनी पिसा गावाजवळ नागपूर कॉरिडॉजवळील समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण जखमी झाले असून, त्यांच्यावर मेहकर येथील रु्णालयात उपचार सुरू आहे.

तर भरधाव कार पलटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना नगरसेवकाची कार असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

अपघात एवढा भीषण होता की, समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर वाहतूक काही काळ पोलिसांनी थांबविली होती. तर या अपघातातील मृत आणि जखमी सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: car accident on Samriddhi highway, 6 members of the same family killed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here