Breaking News | Nashik: भीषण दुर्घटना : अक्राळे फाट्याजवळ धडक.
दिंडोरी : रस्त्यावरील अक्राळे फाट्याजवळ बस आणि बलेनो कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात बलेनो कारमधील दोन जणांचा होरपळून जागीच, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. मृत तिघे परप्रांतीय कामगार होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अक्राळे फाट्याजवळ बस एका कारला ओव्हरटेक करीत असताना समोरून आलेली बलेनो कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर काही वेळेतच दोन्ही वाहनांनी पेट घेतला. कारला लागलेल्या आगीने काही वेळेतच रौद्ररूप धारण केले. कारमध्ये सहा प्रवासी होते. मागील सीटवर बसलेले तिघे कारमधून बाहेर पडले; परंतु पुढे बसलेले बी. चिंमा मुगुलाप्पा (२४), कुरवा वेंकटप्पा (३५) या दोघांचा आगीत होरपळून कारमध्ये जागीच मृत्यू झाला.
दोन्ही मृत मूळ मेहबूबनगर, तेलंगणा येथील रहिवासी होते. गंभीर जखमी राजू कोहली यास दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत झाला. अन्य जखमी तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Title: Car and bus caught fire in accident, 3 killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study