Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात कार व दुचाकीत अपघात

Accident: संगमनेर तालुक्यात कार व दुचाकीत अपघात

Car and two-wheeler accident in Sangamner 

संगमनेर | Accident:  संगमनेर तालुक्यातील कासारे गावातील जांभूळवाडी शिवारात कार व दुचाकीत अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

विजय चांगदेव कार्ले असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, रविवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास लोणी नांदूर शिंगोटे रस्त्यावरील जांभूळवाडी शिवारात कार व दुचाकी यांच्यात अपघात घडला. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी दुचाकीस्वार कार्ले याना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकली नाही.  

Web Title: Car and two-wheeler accident in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here