Home संगमनेर नाशिक पुणे महामार्गाच्या बायपासवर कारला आग लागून खाक

नाशिक पुणे महामार्गाच्या बायपासवर कारला आग लागून खाक

car caught fire on the Nashik-Pune highway bypass

Sangamner | संगमनेर:  नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपासवर (दि.17) पहाटे 3 वाजेच्या सुमारास एक कारच्या इंजिनला आग (Fire)लागून संपूर्ण कार जळून भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने चालक कारमधून बाहेर पडल्याने त्याचा जीव बचावला.

कारच्या इंजिनमधील बिघाडामुळे कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मनोहर दत्तात्रय सोनवणे (54) रा. जळगाव व जिब्राण शेख हे होंडा सिटी कार क्र. एम. एच. 15/ एफ. एफ. 7860 ही घेऊन पुणेच्या दिशेने जात असताना नांदूरशिंगोटे बायपासवर आल्यानंतर कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागला. काही करण्याच्या आताच संपूर्ण कारला आग (Fire) लागल्याने सोनावणे व शेख यांनी तात्काळ कार रस्त्याच्या कडेला घेत कारमधून पळ काढला. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने कार पूर्णतः जळून खाक झाली.

Web Title: car caught fire on the Nashik-Pune highway bypass

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here