संगमनेर ब्रेकिंग: कार उलटून अपघात, कार मधील पाच जण…
Sangamner Accident: जांभूळ वाडी परिसरात कार उलटून अपघात झाल्याची घटना, या अपघातात पाच जण जखमी.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी फाटा शिवारात कार उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून कार मधील पाचजण थोडक्यात बचावले. मंगळवारी (दि. 8) सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास या अपघाताची घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर जांभूळवाडी फाटा शिवारात कार (क्रमांक एमएच 01 सीपी 6402) उलटून अपघातग्रस्त झाली. लोणीच्या दिशेने कार जात असतांना हा अपघात झाला. त्यानंतर स्थानिक रहिवाशांच्या मदतीने कार मधील किरकोळ जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मात्र जखमींची नावे व अधिक तपशील मिळू शकला नाही. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद नसल्याचे पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी सायंकाळी सांगितले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कार मधील एकाच कुटुंबातील पाचही व्यक्ती बचावल्या आहेत.
Web Title: Car overturn accident, five people injured
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App