Home कोल्हापूर ब्रेकिंग: कार २० फूट नदीत कोसळली, चक्काचूर झाला

ब्रेकिंग: कार २० फूट नदीत कोसळली, चक्काचूर झाला

Kolhapur News: पाच जण आपल्या कारसह तब्बल वीस फूट खोल कासारी नदीत पडले. अपघातात (Accident) कारचा चुराडा झाला, सुदैवाने कारमधील पाचही जण बचावले.

car plunged 20 feet into the river Accident

कोल्हापूर: विशाळगडकडे जाणाऱ्या रोडवर गजापूर बौद्धवाडी येथे एक अजब घटना समोर आली आहे. विशाळगड फिरण्यासाठी आलेले हातकणंगले येथील पाच जण आपल्या कारसह तब्बल वीस फूट खोल कासारी नदीत पडले. या अपघातात कारचा चुराडा झाला. सुदैवाने कारमधील पाचही जण बचावले आहेत. यामुळे बघणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या दुर्घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पाच जण (एम एच 09 डी ए 15 37) या वाहनातून विशाळगड येथे देवदर्शनासाठी आणि सहलीसाठी आले होते. यावेळी विशाळगड फिरून येत असताना गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर पैकी बौद्धवाडी येथे पुलाच्या वळणावर कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट वीस फूट खोल नदीपत्रात पडली, अशी माहिती मिळाली आहे.

उन्हाळा असल्यानेकासारी धरणातील पाणीसाठा सध्या कमी झाला आहे. यामुळे कार पडली त्या ठिकाणी पाणी नव्हते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. आणि १०८ रुग्णवाहिकेद्वारे कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील चालक शुभम कोळी, यश हाप्पे यांच्या सह ५ जण केवळ जखमी झाले आहेत. सुदैवाने सर्व बाचवले आहेत. यापैकी दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित तिघेही हातकणंगलेमध्ये आपापल्या घरी पोहोचले आहेत. तब्बल वीस फुटावरून भरधाव वेगाने आलेली कार खाली कोसळली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर सर्वांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: car plunged 20 feet into the river Accident

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here