Home अकोले अवैध दारू वाहतूक करणारी गाडी राजूर पोलिसांच्या ताब्यात

अवैध दारू वाहतूक करणारी गाडी राजूर पोलिसांच्या ताब्यात

Akole | Rajur News: १६ हजार रुपयांची दारू व चार चाकी गाडी पोलिसांनी जप्त केली (seized).

Car transporting illegal liquor in custody seized of Rajur police

राजूर: कोल्हार घोटी रोडने एक इसम चार चाकी वाहनातून दारूचे बॉक्स घेऊन जात असताना राजूर पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. यामध्ये १६ हजार रुपयांची दारू व चार चाकी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ प्रकाश भैलुमे, पो. हवालदार विजय मुंढे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. अशोक काळे, पो. कॉ. आकाश पवार, राकेश मुलाने यांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी कोल्हार-घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी केली होती. दरम्यान एक व्यक्ती मारुती कंपनीची अल्टो गाडी क्रमांक एम. एच. 04 -सीएम. 8666 घेवून समोरुन आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 16,800 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली, व 1,50,000 रुपये किमतीच्या मारुती कंपनीची अल्टो गाडी असा एकुण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दारुची वाहतूक करणारा किसन सोना बांडे (वय 45 वर्ष, रा. खडकी खुर्द, ता. अकोले) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 162/2022 मुंबई पोलीस अ‍ॅक्ट कलम 65 (अ), 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वाडेकर करत आहे.

Web Title: Car transporting illegal liquor in custody seized of Rajur police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here