अहमदनगर: फटाक्याच्या थिणगीने कार जळाली
Breaking News | Ahmednagar: लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून लागलेल्या आगीत नवी कोरी कार जळून खाक.
अहमदनगर: नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून लागलेल्या आगीत नवी कोरी कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सांडवा फाटा येथे समाधान लॉन्सवर लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगलाष्टका पूर्ण झाल्यानंतर मंडपापासून काही अंतरावर नातेवाइकांनी फटाक्यांच मोठी आतषबाजी केली. फटाक्यांमधून उडालेल्या ठिणग्या परिसरातील वाळलेल्या गवतावर पडल्याने गवतान पेट घेतला. गवत पेटल्याची बाब निदर्शनास येण्याआधीच आगीचा ह भडका थेट जवळच उभ्या केलेल्य कारजवळ जाऊन पोहोचला आणि कारने पेट घेतला. उपस्थितांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केल मात्र उन्हाच्या तीव्रतेने आगीने आणखी भडका घेतला आणि काही मिनिटांतच ही संपूर्ण कार जळून खाक झाली. आग लागल्याचे निदर्शनास येतान तेथील अन्य वाहने तत्काळ काढून घेण्यात आली.
Web Title: car was burnt by the burst of crackers
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study