संगमनेर: मालवाहू टेम्पो पुलावरुन उलटून अपघात
Sangamner Accident: तळेगाव दिघे (ता. संगमनेर) गावानजीकच्या पुलावरून रात्रीच्या सुमारास मालवाहू टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटून अपघातग्रस्त.
तळेगाव दिघे: संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघे (ता. संगमनेर) गावानजीकच्या पुलावरून रात्रीच्या सुमारास मालवाहू टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटून अपघातग्रस्त झाला. शुक्रवारी (दि. १३) रात्री १.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सदर अपघातातून चालक व क्लिनर दोघेही बालंबाल बचावले.
पुणे येथून साहित्य घेवून मालवाहू टेम्पो (क्र. एमपी. ४१, एचए. ३९२१) प्रीतमपूर (उत्तर प्रदेश) येथे चालला होता. शुक्रवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास सदर टेम्पो तळेगाव दिघे गावानजीकच्या पुलादरम्यान आला असता समोरून आलेले वाहन वाचविण्याच्या नादात टेम्पो उलटून पुलाच्या कडेला अपघातग्रस्त झाला. या अपघातातून चालक बद्री चव्हाण (रा. धरमप्रीत) व क्लिनर (नाव समजू शकले नाही) हे दोघेही बालंबाल बचावले. अपघातात टेम्पोची चारही चाके वर झाल्याचे दिसून आले. तसेच मोठे नुकसान झाले. याबाबत चालक बद्री चव्हाण यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली नव्हती.
Web Title: Cargo Tempo overturns from bridge accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study