Home अकोले अकोले: भांगरे माय-लेकांसह २९ जणांवर गुन्हे दाखल, निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न

अकोले: भांगरे माय-लेकांसह २९ जणांवर गुन्हे दाखल, निळवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न

Akole Crime: २९ आंदोलकावर अकोले पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल.

Case filed against 29 protesters including Bhangre My-Lake, attempt to break Nilawande canal

अकोले: निळवंडे कालव्याच्या कळस ते खानापूर या परिसरात प्रांताधिकारी यांच्या आदेशाने कलम १४४ लागू असताना निळवंडे डाव्या कालव्याजवळ जमावाने एकत्र येत कालवा फोडण्याचा प्रयत्न केल्याने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे, त्यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह २९ आंदोलकावर अकोले पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत अकोले पोलिसांत पो. नाईक सुहास गोन्हे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लोकांना जमवून टाकळी गाव शिवार ते खानापूर शिवारादरम्यान निळवंडे धरणाच्या डावा कालव्याच्या बांधावरून चालत येऊन ओढ्याजवळ टिकाव खोऱ्याच्या सहाय्याने कालवा खोदण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर खानापूर गर्दणी डाव्या कालव्याच्या पुलावर बैठक मांडून आंदोलन करून कलम १४४ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकर्ते कर्ते श्रीमती श्रीमती सुनीताताई अशोक भांगरे, मिनानाथ सखाराम पांडे, अमित अशोक भांगरे, सुरेश संपत गडाख, बाळासाहेब बाबुराव भांगरे, माधव राजाराम भांगरे, अनिकेत धर्मनाथ थिटमे, बबनराव पुंजाजी तिकांडे, रामहारी तिकांडे, कविता भांगरे, इंदुबाई शिवाजी थिटमे, अनुसयाबाई थिटमे, भाग्यश्री विजय आवारी, विनोद हांडे, विकास बंगाळ, संत तिकांडे, महेश भानुदास तिकांडे, राजेंद्र कुमकर, राजेंद्र शेवाळे, मंदा उल्हास वाकचौरे, अनिती भास्कर आरोटे, मंजेरी सागर आरोटे, शैला संदीप मधे, अनिता संजय रुद्रे, शकुंतला राजाराम आरोटे, जयश्री अशोक देशमुख, संगीता राजाराम शिदे, पुष्पा अनिल थिटमे, रामहरी भाऊसाहेब चौधरी या २९ सह इतर ८ ते १० सर्व रा. ता. अकोले यांच्या विरोधात भा. द. वि. कलम १८८ व मुं.पो. कायदा कलम ३७ (१), (३)/१३५ प्रमाणे अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case filed against 29 protesters including Bhangre My-Lake, attempt to break Nilawande canal

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here