Home महाराष्ट्र संगमनेरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner Crime:  बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.

case has been registered against 5 people for transporting illegal sand 

संगमनेर : शहरातील प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा जोरात सुरू आहे. त्याचा प्रत्यय आ. अमोल खताळ यांना नुकताच आला. शहरातील जमजम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी येत असताना त्यांना रस्त्यात अवैध वाळूची पिकअप आढळून आली. त्यांनी महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरातील जमजम कॉलनीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. खताळ गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते घरी जात असताना जमजम कॉलनीत त्यांना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वाळूने भरलेली पिकप येताना निदर्शनास आली. त्यांनी त्या पिकअप चालकाला थांबवले आणि त्याच ठिकाणावरून महसूल आणि पोलीस प्रशासनाला फोन करून लगेच कायदेशीर कारवाई करा, असे आदेश दिले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येवून २ लाख रुपये किंमतीची पिकअप आणि अर्धा ब्रास वाळू पिकअप ताब्यात घेतली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अजहर रमजान शहा (वय २२, रा. कुरण रोड, संगमनेर), विकास पोपट गिहे (वय २०, रा. नान्नज पारेगाव, ता. संगमनेर), गिरीष सुरेश बर्डे (वय २४, रा. नान्नज पारेगाव, ता. संगमनेर), राजू गणपत गुहे (वय १९, रा. नान्नज पारेगाव, ता. संगमनेर) व मोमीन पेंटर या पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: case has been registered against 5 people for transporting illegal sand 

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here